आंगणेवाडी भराडी देवी जत्रा 2019 यंदा 25 फेब्रुवारीला


निसर्गरम्य कोकण टीम:

कोकणवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडीदेवीच्या वार्षिक जत्रौत्सवाची तारीख जाहीर झाली आहे. १८ डिसेंबर २०१८ ला देवीने दिलेल्या कौलानुसार भराडी देवीची जत्रा २५ फेब्रुवारी २०१९ ला होणार आहे.

महाराष्ट्रातील अनेक जागृत देवस्थाने आहेत. भक्त या देवतांना आपली इच्छा व्यक्त करतात आणि देवतादेखील त्यांची इच्छा पूर्ण करतात. भक्त अशा जागृत देवस्थानांकडे नवसरुपी साकडे घालून त्याबदल्यात नारळ, सोने, चांदी, साडी अशा विविध वस्तू देवाला भेट देऊन नवसाची परतफेड करतात. नवसाला पावणाऱ्या देवस्थानांची ख्याती सर्वदूर पसरत असते.

कोकणातील आंगणेवाडीची भराडी माता भारतातील प्रसिध्द जागृत देवता आहे. आंगणेवाडीची जत्रा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. दरवर्षी भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक मालवणमध्ये येतात.

CLICK HERE TO READ THIS ARTICLE IN ENGLISH

सिंधुदुर्गमधील मालवण तालुक्यातील मसुरे गावात भराडी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर मालवणपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर आणि कणकवलीपासून 33 कि. मी. अंतरावर आहे. अंगणवाडीला भेट देण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन कणकवली आहे.

या देवीची वार्षिक जत्रा साधारणपणे दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यांत आयोजित केली जाते. दरवर्षी डिसेंबर महिन्यात पुढील वर्षीच्या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख निश्चित केली जाते. जत्रेचे आयोजन आंगणे कुटुंबियांद्वारे केले जाते.

भराडी देवीची जत्रा विशिष्ट तारखेला घेण्यात येत नाही. जत्रेची तारीख धार्मिक प्रथेनुसार ठरवली जाते. भराडी देवीच्या जत्रेच्या तारखेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते.
एकदा तारीख निश्चित झाली कि कोकणात जाणाऱ्या रेल्वे, बस आणि खाजगी वाहनांचे बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते.

देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक हि जत्रा गाठत असते. देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागतात. विविध क्षेत्रांतील मान्यवर या जत्रेला आवर्जून भेट देत असतात.

Web Title:
anganewadi bharadi devi jatra 2019 anganewadi jatra 2019 dates when is anganewadi jatra 2019 when is anganewadi jatra 2018 anganewadi jatra in marathi anganewadi jatra 2019 date declared anganewadi jatra 2018 dates kunkeshwar jatra 2019 anganewadi jatra date 2019